जळगाव जिल्हा पर्यटन

उनपदेव

उनपदेव

  • उनपदेव, जिल्हा जळगाव
  • 1 दिवस
  • ३८ कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय
  • झरा

उनपदेव हे गरम पाण्याच्या झऱ्याचे ठिकाण जळगावपासून ३८ कि.मी. अंतरावर आहे. रामायण काळात येथे राहणाऱ्या शरभंग ऋषींच्या उपचारासाठी प्रभू रामचंद्राने येथे बाणाने उष्णोदकाचा झरा निर्माण केला, अशी आख्यायिका आहे.

  • रामायण काळात येथे राहणाऱ्या शरभंग ऋषींच्या उपचारासाठी प्रभू रामचंद्राने येथे बाणाने उष्णोदकाचा झरा निर्माण केला, अशी आख्यायिका आहे.
  • एका देवळाच्या खालच्या बाजूने भरीव दगडास लागून असलेल्या गोमुखातून ७.५ मी. लांब व सुमारे १.७५ मी. उंचीच्या मोठ्या तांबड्या विटात बांधलेल्या हौदात गरम पाणी पडते. हे पाणी चवहीन असून त्यास विशिष्ट वास येतो.
  • इ. स. १९३२-३३ मध्ये हौदाची दुरुस्ती पद्मालयच्या गोविंदा महाराजांनी केली.

  • इ. स. १९४३ मध्ये अमळनेरच्या प्रताप शेठजींनी येथील जुन्या धर्मशाळेची दुरुस्ती केली.
  • या परिसरात मुरलीधर (कृष्ण-बलराम), राम (सीता व लक्ष्मणासह), हनुमान, महादेव, गणपती आणि शनी यांची देवालये आहेत. उत्तरेस टेकडीवर गोविंद महाराजांची समाधी आहे.
  • उष्णोदक हौदाच्या पश्चिम बाजूस लागूनच जमिनीत शरभंग ऋषीची गुंफा आहे. गुंफेत महादेवाचे लिंग आहे.
फोटो गॅलरी
उनपदेव
Scroll