जळगाव जिल्हा पर्यटन

बहिणाबाई चौधरी वस्तुसंग्रहालय

बहिणाबाई चौधरी वस्तुसंग्रहालय

  • जळगाव
  • 1 दिवस
  • ० कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय
  • वस्तुसंग्रहालय

मराठी साहित्यिकांमध्ये बहिणाबाई चौधरी यांचे नाव अग्रस्थानी आहे. या कवयित्रीच्या सर्व वस्तू जतन करून ठेवण्यासाठी सन २००८ मध्ये बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या अध्यक्षतेखाली 'बहिणाई स्मृती' या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

  • कवयित्री बहिणाबाई चौधरी राहत असलेल्या जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात – त्यांच्या राहत्या घरात - हे संग्रहालय ट्रस्टद्वारे निर्माण केलेले आहे.
  • या संग्रहालयामध्ये बहिणाबाई चौधरी यांनी वापरलेल्या दैनंदिन वस्तूंचा संग्रह केलेला आहे.
  • त्यात त्या ज्या जात्यावर दळताना गाणी गात असत ते जातेही आहे. मुसळ, सुगरणीचा खोपा, स्वयंपाकासाठी लागणारी मातीची, तांब्या-पितळ्याची भांडी, पानाचा डबा, बटलोई, तवा आणि चुल्हा, भाकरी बनविण्याचे पायल, टोपले, त्यांच्या वापरातील वहाणा म्हणजेच चप्पल, शेती अवजारांमध्ये विळा, कोयता, दाभण इ. चा समावेश आहे.
  • ही वास्तू आहे त्या स्थितीतच तिचे जतन केले जात असून वेळावेळी या लाकडी खांबांना बेल तेल देणे, वस्तूंना कीड लागू नये म्हणून आवश्यक फवारणी तंत्र, इमारत दुरुस्तीसह देखभाल केली जाते.
  • वरच्या मजल्यावरच्या खोलीला आजही गायीच्या शेणाने सारविले जाते आणि खोलीच्या भिंतींना माती रंगाने लिंपण केले जाते.

  • याठिकाणीच बहिणाबाई चौधरी यांच्यावर उपलब्ध साहित्याचे ग्रंथालय निर्मिती अवस्थेत आहे.
  • यात बहिणाबाईंवर लिहिलेली पुस्तके, प्रबंध, लेख ऑडिओ-व्हिडीओ, तसेच नामवंत कवींच्या कवितांची पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
  • ही वास्तू जतन करण्याकामी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टला भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन यांचे सहकार्य लाभते.
  • आजवर अनेक नामवंत साहित्यिक, विद्यार्थी यांनी संग्रहालयाला भेटी दिलेल्या आहेत.
  • बहिणाबाई राहत असलेल्या या घरात आजही बहिणाबाईंची नातसून पद्माबाई व पणतसून स्मिताताई, खापरपणतू देवेश चौधरी याच वाड्यात राहतात.
  • बहिणाईंच्या नात्यातील दीनानाथ, निवृत्ती, कैलास व अशोक चौधरी आणि संपूर्ण चौधरी परिवारदेखील याच ऐतिहासिक चौधरी वाड्यात राहतो.
फोटो गॅलरी
बहिणाबाई चौधरी वस्तुसंग्रहालय
Scroll