जळगाव शहर महापालिकेचे बसस्थानकालगत ४ एकर जागेवर असलेले महात्मा गांधी उद्यान १९६१ मध्ये उभारण्यात आले आहे. नुकतेच जैन इरिगेशन उद्योग समुहाच्या माध्यमातून या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले.
उद्यानात महात्मा गांधींच्या पेटी, चरख्याच्या रचनेवर आधारित असलेला ६२५ मीटर लांबीचा व ४ मीटर रुंदीचा वॉकिंग ट्रॅक
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे ओपन जीम आहे.
गांधी उद्यान नयनमनोहर कारंजे.
मनोरंजनासाठी नवीन खेळणी.
२० हजार फुटांचे प्रशस्त लॉन.
१२०० प्रेक्षक बसू शकतील असे खुले प्रेक्षागृह.
४० फूट रुंदीचे स्टेज अशा सुविधांमुळे हे उद्यान नागरिकांसाठी आकर्षणस्थळ ठरत आहे.