अजिंठा लेणी ही जरी औरंगाबाद जिल्ह्यात असली तरी या जळगाव जिल्ह्याच्या अगदी जवळ असून विंध्याद्री पर्वतरांगांमुळे खान्देशाचाच एक भाग आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपट व ऐतिहासिक कागदपत्रात अजिंठ्याचा उल्लेख खान्देशाशी जोडूनच केला गेला आहे.
जळगाव जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसाठी जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून जळगावची ओळख.
अजिंठा लेणी ही जरी औरंगाबाद जिल्ह्यात असली तरी या जळगाव जिल्ह्याच्या अगदी जवळ आहे.
प्राचीन शिलालेख, ताम्रपट व ऐतिहासिक कागदपत्रात अजिंठ्याचा उल्लेख कान्हदेशाची जोडूनच दिसतो.
अजिंठा लेणी जळगाव शहरापासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे.
फर्दापूर हे जळगाव जिल्ह्यातील मोठे गाव लेण्यांपासून केवळ ५ कि.मी. अंतरावर आहे.
वाघूर या नदीच्या काठावर अजिंठा लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
अजिंठ्याला प्राचीन (महाजनपद) कालखंडात ऋषिक प्रदेश असे उल्लेखिले गेले आहे.
अजिंठा गुंफांमध्ये दगडात कोरलेल्या 29 बौद्ध गुंफा आहेत.
ऋषिक प्रदेशाच्या राजाने १७ ते २० क्रमांकाच्या गुहा दान केल्या होत्या, असेही शिलालेखात नमूद आहे.
अजिंठा लेण्यांतील शिलालेखातदेखील जळगाव जिल्ह्यातील फर्दापूरजवळील थाना गावाचा उल्लेख येतात. उदा. लेणी क्र. १२ मध्ये असलेल्या शिलालेखात पुढील उल्लेख येतोः 'थानको देयधम्मम घनामदडस वणिजस सौववरको सौपा सथो'
अजिंठा येथे पूर्वी नदीच्या काठी विटांपासून बांधलेला बौद्ध मठ होता. सन २०१२ मध्ये या मठाचा पाया थाना या गावात आढळून आला. वरील शिलालेखाचा थाना या गावाशी असलेला संबंध या मठामुळे लक्षात येतो. लाकूड, दगड आणि विटांपासून बांधलेले अनेक मठ त्या काळी होते, असा पुरावा मिळतो.
अजिंठा गुंफांमध्ये दगडात कोरलेल्या एकोणतीस बौद्ध गुंफा आहेत. त्यांचा कालखंड इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून इ. स. सहाव्या शतकापर्यंत आहे.
दगडावर चितारलेली चित्रांमध्ये गौतम बुद्धांच्या पुनर्जन्म आणि जातककथा यांचे चित्रण केलेले दिसते. प्राचीन भारतीय कलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाऱ्या या कलाकृतींमध्ये केवळ शरीरस्थितीच्या माध्यमातून भावभावनांचे उत्तम चित्रण केले आहे.
युनेस्को अहवालानुसार या गुंफा म्हणजे बौद्ध वास्तुकलेचा उत्कृष्ट आविष्कार आहेत. त्यांना 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चा दर्जा देण्यात आला आहे.
अजिंठा येथील गुंफांची सुरुवात सातवाहन काळात झाली व ही निर्मिती पुढे अनेक टप्प्यांमध्ये होत गेली. बहुतेक गुंफा या विहारांच्या स्वरूपात आहेत. प्रत्येक विहारात भिंतीत खोदलेले कक्ष आहेत. तसेच पूजा व प्रार्थना यासाठी चैत्यदेखील आहे.