जळगाव जिल्ह्यातील एरंडोलपासून १६ किलोमीटरवर आणि कासोदा या गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर फरकांडे हे गाव उतावली नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावी नदीच्या किनाऱ्यावर पिसा येथील झुलत्या मनोऱ्यांची आठवण करून देणारे व स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले झुलते मनोरे आहेत. काही इतिहासतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे २५० वर्षांपूर्वी चांदमोमीन नावाच्या इसमाने ही मशीद बांधली आहे. तर काही इतिहासतज्ज्ञांच्या मते फारूकी राजांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी या वास्तूची निर्मिती केली असावी.