यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्यरस्त्यावर चिंचोली किनगावच्या पश्चिम दिशेला आडगाव फाटा आहे. या फाट्यापासून ९ किलोमीटर अंतरावर श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र आहे.
या मंदिरापासून सातपुडा पर्वतामध्ये ४ ते ५ कि.मी. अंतरावर गवळीवाड्यांचे अवशेष आहेत.
ईश्वरसेन हा अहीर राजा या भागात राज्य करत असताना त्याने या परिसरात हेमाडपंतीमंदिराची बांधणी केल्याचे उल्लेख आढळतात. मंदिराभोवती असलेल्या १३ फूट उंच व २ कि.मी. लांब भिंतीच्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
मंदिराच्या परिसरात ७ ते ८ विहिरी आहेत. या भव्य मंदिराचा सभामंडप ८६ फूट x ५० फूट, तर गाभारा २२ फूट x १४ फूट इतका भव्य आहे.
मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिरासमोर ४०० फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे.