जळगाव जिल्हा पर्यटन

चांगदेव मंदिर

चांगदेव मंदिर

  • चांगदेव, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव
  • 1 दिवस
  • ६० कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय

मुक्ताईनगर हे जळगाव शहरापासून ६० कि.मी. अंतरावर असून गावास संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण संत मुक्ताबाई यांचा वारसा लाभलेला आहे. तापी व पूर्णा अशा दोन नद्यांचा संगम मुक्ताईनगरजवळ आहे.

  • मुक्ताईनगर हे जळगाव शहरापासून ६० कि.मी.
  • तापी व पूर्णा अशा दोन नद्यांचा संगम मुक्ताईनगरजवळ आहे.
  • चांगदेवाचे मंदिर हेमाडपंती म्हणजे दगडात बांधलेले आहे.
  • मुक्ताईनगर गावास संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण संत मुक्ताबाई यांचा वारसा लाभलेला आहे.

  • संत मुक्ताबाईंचे शिष्य झालेले हठयोगी संत चांगदेव यांचे हे मंदिर असल्याबाबतचा उल्लेखही येथे आढळतो.
  • 'तत्त्वसार' हा ग्रंथ चांगदेवांनी एदलाबाद म्हणजे मुक्ताईनगर येथे इ.स. १३१२ मध्ये लिहिला. अर्धस्तंभ मूर्ती, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, वेलपत्ती व आडवे शिल्पपट्टे, लाकडी वास्तप्रमाणे बाहेरील सज्जाजवळ वापरलेल्या दगडी लोलकाकृती नद्वी अशी अनेक वास्तुवैशिष्ट्ये या भागात दिसून येतात.
  • चांगदेवाचे मंदिर हेमाडपंती म्हणजे दगडात बांधलेले आहे. या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे ही वास्तू अतिशय मजबूत बनली आहे.
  • देऊळ ३२ मीटर लांब व ४० मीटर रुंद आहे. सभामंडप सुमारे १४ मीटर उंच असून प्रत्येक कोपऱ्यात चार पूर्ण-स्तंभ व चार अर्ध-स्तंभ आहेत. येथे सोळा पूर्ण-स्तंभ व सोळा अर्ध-स्तंभ, त्यावर मजबूत छत व त्यावर दगडी कलश अशी मूळ योजना असली तरी शिखराचा भाग नंतर विटांनी बांधलेला आढळतो. सभामंडपाचे अंतराळावर अंडाकृती व नक्षीदार असे उतरते छत आहे.
फोटो गॅलरी
चांगदेव मंदिर
Scroll