जळगाव जिल्हा पर्यटन

पाल

पाल

  • रावेर, जिल्हा जळगाव.
  • 1 दिवस
  • ७४ कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय
  • निसर्गरम्य पर्यटनस्थळ

पालहे सातपुड्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ जळगावहून ७४ कि.मी. अंतरावर आहे.

  • पूर्वीच्या काळी पाल हे जवळपास असलेल्या ७३ गावांचे मुख्य ठाणे होते.
  • पाल येथील जुन्या किल्ल्याचे बुरुज, तट व इतर अवशेष तसेच सुकी नदी काठावरील नागझरीचे अवशेष या स्थळाची प्राचीनता दर्शवितात.
  • आभीर अधिपतींचे राज्य असताना येथे त्यांचे स्थानिक मुख्यालय होते.
  • पुढील काळात फारूकीचे देखील येथे ठाणे होते.

  • पाल येथील हत्तीवाड्याचे अवशेष पाहता पालला बरेच ऐतिहासिक महत्त्व असावे हे लक्षात येते.
  • काही अभ्यासकांच्या मते हत्तीवाडा म्हणजे सुरक्षित बंदिस्त बाजारपेठ असावी.
  • मागील काही वर्षांत पालला स्थानिक पर्यटनस्थळाचे महत्त्व आले आहे.
  • याठिकाणी अभयारण्यही उभारण्यात आले असून वन विभागाच्या विश्रामगृहाव्यतिरिक्त पर्यटकांसाठी निवासासाठी खास आदिवासी कुटीही उपलब्ध आहेत.
फोटो गॅलरी
पाल
Scroll