जळगाव जिल्हा पर्यटन

व्यास मंदिर

व्यास मंदिर

  • यावल, जिल्हा जळगाव
  • 1 दिवस
  • ४० कि.मी. जळगावपासून
  • 3+ वय
  • मंदिर

जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील व्यास मंदिर हे भारतातील महर्षी व्यासांचे एकमेव मंदिर मानले जाते.

  • जळगावपासून 40 कि.मी. वर यावल येथे भारतातील महर्षी व्यासांचे एकमेव मंदिर.
  • मंदिर अतिशय पुरातन असून दरवर्षी आषाढ शुद्ध व्यास पौर्णिमेला भाविकांची येथे मोठी गर्दी होते.

  • टाळमृदुंगाच्या व झांजाच्या गजरात व्यासाचे अभंग म्हणत वारकरी येथे पायी येतात.
  • हिंदुधर्मातील १८ पुराणे, ४ उपपुराणे, ४ वेद, ४ शास्त्रे, १०८ उपनिषद, महाभारत यांचे कर्ते म्हणून महर्षी व्यासांना ओळखले जाते.
  • धर्मकारण, समाजकारण, राजकारण असे सर्व प्रकारचे वाङ्मय व्यासांनी निर्मिले आहेत अशी श्रद्धा आहे.
फोटो गॅलरी
व्यास मंदिर
Scroll